पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (जीवन पंढरी) कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मुख्य प्रबंधक अरुण मिरगे यांच्या हस्ते एलआयसीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विमा प्रतिनिधी प्रशांत माळवदे यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कार्याची दखल घेत झालेल्या या सत्काराबद्दल उपस्थितांनी प्रशांत माळवदे यांचे अभिनंदन केले.
यावेळी सांगोला शाखाधिकारी ज्ञानेश्वर खंदारे, शाखाधिकारी अश्विनी बिराजदार, विकास अधिकारी बी. एस. चौगुले यांच्यासह एलआयसीचे विकास अधिकारी,विमा प्रतिनिधी, कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपशाखाधिकारी अश्विनी बिराजदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

