स्वातंत्र्याच्या अमृतप्रवासातून आर्थिक स्वावलंबनाकडे, शरदचंद्र पवार साहेबांचे नागेश फाटे यांनी घेतले मार्गदर्शन!
देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश एकनाथ फाटे यांनी सिल्व्हर ओक येथे सदिच्छा भेट घेतली.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे तर प्रत्येक नागरिकाला रोजगार, व्यवसायाच्या संधी आणि आर्थिक स्वावलंबन मिळणे या व्यापक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील उद्योग-व्यापार क्षेत्रासमोरील प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.
लघु उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि नव्या पिढीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी शासनदरबारी प्रभावीपणे मांडणे, चाकण मधील उद्योगांच्या स्थलांतरणाचा निर्णय, युवकांना उद्योग-व्यवसायाकडे वळविणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी आगामी काळातील उपक्रमांबाबतही विचारविनिमय केला व मार्गदर्शन घेतले.
“स्वातंत्र्याचा खरा अर्थ आर्थिक संधी प्रत्येकापर्यंत पोहोचण्यात आहे,” या विचाराला केंद्रस्थानी ठेवून उद्योग व व्यापार विभागाचे संघटन अधिक व्यापक करण्याचा निर्धार नागेश फाटे यांनी व्यक्त केला.
पवार साहेबांचे मार्गदर्शन, अनुभव आणि राष्ट्रहिताची व्यापक दृष्टी माझ्या आगामी सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वासही फाटे यांनी व्यक्त केला.
लेखन - नागेश फाटे

