पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथे आय.क्यू.ए.सी. व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य जाकीर बागवान होते. यावेळी उमा शिक्षण संकुलाचे विश्वस्त मा. प्रा. डॉ. मिलिंद परिचारक विभाग प्रमुख श्री दत्तात्रय घाडगे, उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. सविता दूधभाते यांनी केले. त्यांनी ग्रंथालयाचे महत्त्व व डॉ. रंगनाथन यांचे योगदान स्पष्ट केले. तसेच ग्रंथालय विभाग प्रमुख यांनी ग्रंथालयाच्या पाच सिद्धांताचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त मा. प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, अॅड. प्रणव परिचारक तसेच संस्थेचे सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य जाकीर बागवान, प्रा. डॉ. विलास बंडगर, प्रा. सविता दूधभाते, प्रा. दिनेश वायदंडे प्रा. रोहित खिस्ते, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उमा शिक्षण संकुलाचे प्रशासन अधिकारी श्री सुर्यकांत पारखे, व शिक्षकेतर कर्मचारी श्री विजय वाघमारे, श्री दत्तात्रय घाडगे, श्री त्रिगुण लोखंडे, श्री अख्तर पटवेकरी, श्री सागर येडगे यांचे सहकार्य लाभले.

