पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या बावीस विद्यार्थ्यांची तांदुळवाडी येथील सायली बिरा बंडगर, पंढरपूर येथील ओंकार रविंद्र भोसले, ऋुतुजा महादेव चौगुले, वैष्णवी अशोक कदम, अभिजीत भिमराव सलगर, प्रथमेश राजू साळुंखे, धनश्री सुनिल शिंदे, संजना उत्तम सुरवसे, गुरसाळे येथील धिरज पांडुरंग घाटे, अभिषेक साहेबराव घाटुळ, मुंबई येथील गणेश ज्ञानेश्वर जाधव, शेटफळ येथील जुनेद जमादार, सोनके येथील विशाल अंबादास कदम, कलढोण, ता.खटाव येथील तेजस्वी यशवंत खांडेकर, कासेगांव, ता.पंढरपूर येथील आरती प्रशांत माळगे, अक्कलकोट येथील सोहम संतोष सादिगले, परिते, ता.माढा येथील अन्वर खाजू शेख, चलाईवाडी, ता.पंढरपूर येथील गौरी दुर्योधन शेळके, उपरी, ता.पंढरपूर येथील अजय राजाराम वाघमारे, अजंनसोंड, ता.पंढरपूर येथील गौरी शिवलाल वरले, सोनके, ता.पंढरपूर रोहन राजेंद्र बाबर, उलुप, ता.भूम, जि.उस्मानाबाद येथील दत्तात्रय सिताराम राऊत या विद्यार्थ्यांची प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी दिली.
प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही भारतातील प्रीकास्ट काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित बांधकाम करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी निवासी, व्यावसायिक, औद्योगिक तसेच आयटी इमारतींसाठी प्रीकास्ट स्ट्रक्चर्सचे डिझाइन, उत्पादन,वाहतूक आणि उभारणी या सर्व सेवा पुरवते.
अशा या कंपनीत वरील विदयार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम,डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ.सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंतपवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अमोल कांबळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

