वाडीकुरोली, ता. पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वाडीकुरोली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "बँकिंग, शेतीविषयक माहिती व करिअर मार्गदर्शन" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून पर्यवेक्षक कुमार गाजरे उपस्थित होते.
या वेळी बँकिंग व शेती विषयक स्वप्निल जमदाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध नोकरीच्या संधी, बचत खाती, कर्ज योजना तसेच शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचे योग्य नियोजन कसे करावे याबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कुमार गाजरे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील बँकिंग व्यवहारांची माहिती दिली. UPI, मोबाईल बँकिंगद्वारे सुरक्षित व जलद व्यवहार कसे करावेत याबत त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे व सचिव बाळासाहेब काळे गुरुजी व प्राचार्य संजय कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्यासाहेब सरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी जोगी मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. हाडमोडे सर, प्रा. पांढरे , प्रा. गावडे , प्रा. हागवणे , प्रा. नवले मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

