पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील सा. अनंत विचार या वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सा. अनंत विचारचे संपादक नागेश आदापुरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे, शिव शाही न्यूजचे सचिन कुलकर्णी, मोहोळ न्यूजचे संपादक विजयकुमार मोटे, रवि कोळी यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सा. अनंत विचारने गेल्या पाच वर्षांत सामाजिक, शैक्षणिक व विविध स्थानिक विषयांना सातत्याने प्रसिद्धी देत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. या वाटचालीबद्दल संपादक नागेश आदापुरे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सा. अनंत विचारच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त संपादक नागेश आदापुरे व त्यांच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा!

