अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिरातील विद्यार्थ्याना वटवृक्ष देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे गणवेश वाटप करण्यात आले.
हा गणवेश वितरणाचा कार्यक्रम शिशू विकास मंदिर येथे समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व मंदीर समितीचे बांधकाम अभियंता नवनाथ बनकर यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नवनाथ बनकर म्हणाले की देवस्थानचे तत्कालीन माजी चेअरमन कै.कल्याणराव [बाळासाहेब] इंगळे यांनी २९ वर्षांपूर्वी अक्कलकोट शहरातील गोरगरीब घराण्यातील लहान मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यामुळे त्यांच्या शिक्षणाची गरज ओळखून याकरिता देवस्थानच्या वतीने संस्थेच्या विठ्ठल मंदिर येथे श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर या नावे शिशु विकास मंदिराची स्थापना केली. बालकांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. दरवर्षी सर्व बालकांना मोफत शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपले आहे.
आजच्या २१ व्या शतकात पालकांना शिक्षणाचे महत्व कळत असल्याने प्रतिवर्षी गरजू आणि गरीब बालकांची प्रवेश संख्या वाढत आहे. आज या विद्या मंदिरात जवळपास २८७ बालक मोफत शिक्षणाचा लाभ घेतात. आधुनिक काळातील इंग्रजी शिक्षणाची गरज ओळखुन गेल्या ११ वर्षांपासून इंग्रजी विषयही शिकविण्यात येत आहे. विद्यामंदिराच्या या शैक्षणिक उपक्रमामुळे व येथील चांगल्या दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षित शिक्षकवृंद यामुळे गरीब परंतु शिक्षणाची आवड असणाऱ्या बालकांकरिता त्यांच्या पालकांचा या विद्यामंदिरात दरवर्षी प्रवेशाकरिता कल वाढतच आहे. त्यामुळे भविष्यात येथील शैक्षणिक दर्जेचा स्तर आणखीन उंचावण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू असेही प्रतिपादन बनकर यांनी यावेळी केले.
यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, मुख्याध्यापिका स्वाती गाडे, शिक्षिका शशिकला मडीखांबे, वंदना शिर्के, जयश्री माने, गिरीश पवार, संजय पवार, सागर गोंडाळ, सुनिल नायकोडी, रमेश शिंदे सर, संजय मोरे व विद्यार्थ्याचे पालक आदी उपस्थित होते.

