भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
गुरु माऊली प्राॅडक्शन विषुशा अर्चना निर्मित संकल्पना ,निर्माता, दिग्दर्शक, लावणी सम्राट प्रमोद कांदळकर प्रस्तुत ' माझी म्हणू का?' हा पारंपरिक रंगतदार लावणी कार्यक्रम पाहण्याचा योग आला.
आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी प्रमोद कांदळकर यांना 'या कार्यक्रमात तुम्ही चित्रपटातील लावण्या ऐवजी पारंपारिक लावण्याचा समावेश करण्या मागचा आपला हेतू कोणता?'यावर प्रमोद कांदळकर यांनी सांगितले की,' चित्रपटातील लावण्या पाहून प्रेक्षक कंटाळले आहेत,या मध्ये बदल म्हणून मी पारंपारिक लावण्या कार्यक्रमात सादर करीत आहे.' बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह असो, नवी मुंबई मधील विष्णुदास भावे नाट्यगृह असो, साहित्य संघ असो, विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह असो, दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह असो या ठिकाणी लावणी कार्यक्रम असेल तर लावणी वर प्रेम करणारे प्रेक्षक या कार्यक्रमाकडे ओढीने येतात.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गण , गौळण आणि मुजरा सादर केला. नृत्य दिग्दर्शक राजेश गमरे यांनी या लावणी कार्यक्रमात स्वतः नृत्य केले आहे." माझी म्हणू का,ही फियाट गाडी माझी म्हणून का....या गाण्यावर इतर नृत्यांगना सोबत नृत्य सादर करुन धमाल उडवून दिली.नृत्यांगना भूमिका भोसले यांनी"श्रावणाचं ऊन मला झेपेना",ही लावणी सादर केली,साज, शृंगार, आणि लावण्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या नृत्यांगना नमिता पाटील यांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत" कवडसा चांदाचा पडला..बाई ग साजन माझा खुदकन गाली हसला..",ही लावणी सादर करुन वन्स मोअर मिळविला, नृत्यांगना हर्षा राऊत यांनी," किती ठुमकत ठुमकत चाले नार वाण्याची.." ही पारंपरिक लावणी सादर केली, नृत्यांगना भैरवी मिस्त्री यांनी," पंच बाई मुसाफिर अलबेला..." ही पारंपरिक लावणी रंगतदार पणे सादर केली, नृत्यांगना पल्लवी थोरवे यांनी," अहो,राया टोपी घालून तुम्ही या या.." ही लावणी सादर केली, नृत्यांगना शेफाली मुंबईकर यांनी," हिऱ्याची अंगठी रुतून बसली,सोडा माझं बोट,लय दिसांनी झालीय भेट.." ही लावणी सादर केली, नृत्यांगना भक्ती हिने " हिला बघतोय काय.. बघून हसतोय काय.. माझ्या जवळ राया असलं चालणार नाय.." ही लावणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली, नृत्यांगना वसुंधरा कासेगावकर यांनी," वर जरी जास्त झालं..." ही लावणी सादर केली, नृत्यांगना नमिता पाटील यांनी " तुम्ही तिच्या कडे जायचं जरा सोडा,राया तुम्ही मला जीव लावा थोडा थोडा..." ही लावणी सादर केली, लावणी सम्राट प्रमोद कांदळकर यांनी " आंबा तोतापुरी..." ही लावणी सादर केली.नृत्यांगना भूमिका भोसले यांनी," लाल पैठणी रंग माझ्या चोळीला, तुम्ही याव सजन रंग होळीला... ही लावणी सादर केली, नृत्यांगना भैरवी मिस्त्री यांनी " दाटतो ग दंडात बाजू बंध..." ही लावणी सादर केली.नृत्यांगना पल्लवी थोरवे यांनी," आज काल पाटलांचा लय रुबाब...ही लावणी सादर केली.नृत्यांगना हर्षा राऊत यांनी" डाळिंब टचकन फुटलं.." ही लावणी सादर केली, नमिता पाटील यांनी" जाताना तुमचा नंबर देऊन जावा.."ही लावणी सादर करुन धमाल उडवून दिली.वसुंधरा कासेगावकर यांनी" राया थेंबा थेबानं केलय मला गार.." ही लावणी सादर केली, प्रमोद कांदळकर यांनी व इतर सहकारी नृत्यांगना यांनी मिळून" गाडी आणावी बुरख्याची.." ही लावणी सादर केली.प्रत्येक नृत्यांगनाच्या सादरीकरणाला, अदाकारीला, रसिक मंत्रमुग्ध होऊन टाळ्या शिट्या वाजवून प्रतिसाद देत होता.
या लावणी कार्यक्रमाचे वादक नरेश कांबळे, अश्विन यादव, अनिकेत गंगावणे,स्मितेश गोळे, गायिका भाग्यश्री म्हात्रे, संगीता पांचाळ, निवेदक सिद्धेश, लाईट साऊंड सचिन गव्हाणकर, मॅनेजर प्रकाश आंग्ने यांनी या लावणी कार्यक्रमाला साथ दिली.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम 8652305700.

