कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आळंदी, पुणे येथील २३ ऑगस्ट २०२६ : के. एस. आय. पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्या वतीने ३० वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आळंदी येथे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न होणार आहे.संमेलनाचे अध्यक्ष श्री. दशरथ बाबासाहेब धायगुडे, बोरी, सातारा हे असून ते कवी, लेखक, गीतकार, ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार म्हणून परिचित आहेत. संमेलनाचे उद्घाटक कवी दीपक पवार सर, रुकडी असून स्वागताध्यक्ष म्हणून लेखक-कवी मातृभक्त आचार्य प्रा. सी.ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी, पुणे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील, कोल्हापूर यांची उपस्थिती लाभणार आहे.संमेलनात मा. सुमनताई गजानन देसाई, मीरा भाईंदर, मुंबई, मा. सौ. माया नवथर, छत्रपती संभाजीनगर, श्रीमती वाणी वेणूमाधव केरकलमट्टी, डोंबिवली, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन, पुस्तक प्रकाशन, काव्य सादरीकरण, कथाकथन, लोकनृत्य वासुदेव आणि भव्य पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
काव्य व साहित्यिक कार्यक्रम
सकाळी ९.०० वाजता उद्घाटन सत्रास प्रारंभ होणार असून पहिल्या २० कवींना काव्य सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. दुपारी १.०० वाजता कथाकथनकार बाळासाहेब देशमुख, अहिल्यानगर यांचे कथाकथन होईल. दुपारी २.२० वाजता अनिल बाबासो दानोळे (दिवाणजी), इंगळी यांचे लोकनृत्य वासुदेव सादरीकरण होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता कवी संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. सी.ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी, पुणे भूषविणार आहेत. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण
दुपारी ४.०० वाजता मा. चित्रा दिक्षित, बॉलिवूड अभिनेत्री, मुंबई यांच्या हस्ते राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण, कला, काव्य, कथाकथन, कीर्तन, भजन, नृत्यकला आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
यामध्ये कवी डॉ. मधुकर बाबुराव हुजरे, धाराशिव – संत ज्ञानेश्वर माऊली साहित्यरत्न पुरस्कार; श्रीमती वाणी वेणूमाधव केरकलमट्टी – संत मुक्ताबाई साहित्य पुरस्कार; कवी मिलिंद बळीराम खोब्रागडे, गडचिरोली; कवी युवराज कृष्णा पाटील, कोल्हापूर; कवी शांताराम हरिभाऊ भादवणकर, बेळगाव; कवी आनंत वसुदेव साळुंखे, बार्शी; कवयित्री शितलांजली डॉ. संगिता दादासो महाजन-रोटे, कोल्हापूर – ज्ञानशोधक पुरस्कार; कु. तृप्ती राजेश मुदगल (काव्य मधुराज्ञी), आळंदी – संत ज्ञानेश्वर माऊली साहित्य पुरस्कार; कवी रविराज सोनार तथा कबीर, मालेगाव/पुणे; सौ. ज्योती सुरेश वाघ, पेण रायगड; श्री रतन जगन्नाथ खडकाळे, नाशिक – समाजभूषण पुरस्कार; श्री मनीष कांतीलाल मुथा – उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार; श्री. रामभाऊ विठ्ठलराव आवारे, नाशिक – उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार; सौ. कविता पद्माकर बाविस्कर, पंचवटी नाशिक – समाजसेविका पुरस्कार; सौ. सुनंदा साहेबराव पाटील, नाशिक; सौ. माधुरी प्रभाकर कुलकर्णी, जळगाव; दिपमाला रमेश कांबळे, शेगाव – समाजसेविका पुरस्कार; श्री दत्तात्रय गंगाधर वारकड, अहिल्यानगर; कवी संतदास श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर; कवी दीपक पवार, रुकडी; कु. संयोगिता संतोष रोटे, कोल्हापूर – अष्टपैलू नृत्यकलाकार पुरस्कार यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश आहे.
तसेच प्राचार्य राजेंद्र नारायण नष्टे, प्रा. डॉ. रामचंद्र नानासाहेब यादव, राजेंद्र सुंदरदास फंड, बाळासाहेब देशमुख, कवी अशोक महादेव मोहिते, कवी विनायक कृष्णराव पाटील, कवी शिवाजी खाशाबा सावंत, कवयित्री सुनिता दत्तात्रय शेलार, कवी विजय तानाजी पाटील, डॉ. शाम जाधव, गिरीश तापिदास शाह, श्री रोहिदास बुधाजी गांवकर, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. महंत श्री बळीराम महाराज जोगस, कवी दत्तात्रय गोपीनाथ भोसले, डॉ. श्री. दिनेश ताराचंद खैरे, सौ. सुनंदा साहेबराव पाटील, सौ. श्रद्धा दीपक सूर्यवंशी, सौ. पुष्पा दिलीप अतकरे, वनमाला पाटील, डॉ. जितेंद्र जोशी, कवी कांचनदत्त (डी.जी.) पाटील, कवी विजय चंद्रकांत खंडागळे यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवरांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
कवींचा सहभाग
संमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कवी सहभागी होणार असून सौ. समृद्धी प्रविण सावंत-खोत, डॉ. सौ. स्वाती किरण खंदारे, सरोजा गायकवाड, सौ. सुस्मिता रेंदाळकर, सुनील जोतिराम कांबळे, कु. वामान, कु. कोचरे, सौ. प्रिती पवार, महेश वसंत कुलकर्णी आदी कवी काव्य सादरीकरणात सहभागी होणार आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळा
संमेलनाच्या निमित्ताने विविध साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘भावनांचे इंद्रधनुष्य’, ‘युनिव्हर्स : अंतर्मनाचा अंतर्नाद’, ‘तेच हर्षानु : मनातले अंतरंग’, ‘स्मृतींचा काव्यसागर’, ‘अभंग वाणी’, ‘सुख शोधता शोधता’, ‘थोडं मनातलं’, ‘तुझ्या आठवणीत’, ‘सुभाषित-गंध’, ‘तू फक्त माणूस हो..!’, तसेच ‘आळंदी संमेलन विशेषांक’ यांचा समावेश आहे.
या संपूर्ण साहित्य सोहळ्याचे प्रास्ताविक कवी सरकार इंगळी करणार असून सूत्रसंचालन मा. वाडेकर, सौ. सुनिता क्षिरसागर व कवी अशोक मोहिते करणार आहेत.ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, लेखक, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. या साहित्य संमेलनास साहित्यिक, कवी, वाचक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन के. एस. आय. पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

