अदृश्यतेचा सन्मान
आदरणीय पितृतुल्य व्यक्तिमत्व श्री. सुभाषराव माने सर यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीमध्ये शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक तसेच राजकीय यशस्वी कार्याबद्दल असंख्य वेळा त्यांचा यथोचित सन्मान , सत्कार सोहळे झालेले आहेत .
परंतु या त्यांच्या नेत्रदीपक यशामध्ये अदृश्यपणे समईतील मंद ज्योती प्रमाणे तेवत राहणारी , चंदनाप्रमाणे स्वतः झिजून परिवाराला , समाजाला सुगंध देणारी , नाष्ट्याच्या शिऱ्यातील साखरेप्रमाणे अदृश्य राहून त्या शिर्याला " महाप्रसादाचे " रूप प्राप्त करून देणारी आणि आम्हा उभयतांच्या हृदयात आई रुपी एक हळवा कोपरा अढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपले स्थान निर्माण करणाऱ्या आईसाहेब " सौ. सीतादेवी ( काकी ) सुभाषराव माने " यांचे नाव आमच्या " मातोश्री सौ. सरुबाई माने विद्यालय व कला , शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय ,भटुंबरे तालुका : पंढरपूर " शिक्षण संकुलामध्ये पवित्र तुळशी वृंदावनाला सौ .आई साहेबांचे नाव देण्यात आम्हा उभयतांना अतिशय आनंद झाला आहे . आदरणीय संस्थेने सुद्धा माझ्या या छोट्या कार्याला मोठ्या मनाने परवानगी दिली , त्याबद्दल आदरणीय संस्थेचा मी मनापासून ऋणी आहे . सर्वांनाचं मनापासून धन्यवाद
दिनांक : 15/08/ 2026 वार : शनिवार
श्री क्षेत्र पंढरपूर चरणदास : सौ. व श्री. विशाल केशव धट

