अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
महाराष्ट्र शासन, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी तथा संचालक किशोर गांगुर्डे व कुटुंबियांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला सदिच्छा भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांनी गांगुर्डे कुटुंबियांचे देवस्थान कार्यालयात स्वागत करून त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व आशीर्वाद पत्र (विभूती) देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी बोलताना किशोर गांगुर्डे म्हणाले की श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे आल्यावर मनाला विलक्षण शांती मिळाली. चेअरमन महेश इंगळे मालक यांनी देवस्थानच्या माध्यमातून भाविकांसाठी केलेल्या सोयी-सुविधा आणि स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. स्वामी भक्तांसाठी ते करत असलेले कार्य हे प्रेरणादायी आहे. त्यांनी आमच्या कुटुंबाचा जो सन्मान केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहो अशी भावना व्यक्त केली.
यावेळी गांगुर्डे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, महिला व बालक उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विश्वस्त महेश गोगी, सचिव आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, संतोष जाधव आदीसह स्वामी भक्त उपस्थित होते.

