परळी वैजनाथ प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली राज्य महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष मुळे हे परळी वैजनाथ येथे मुक्कामी आले असता त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी सुधीर काकडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन संतोष भाऊ मुळे यांचा सत्कार केला. यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्याचे संघटक कैलास धोकटे, कांत काकडे, महेश धोकटे, यश धोकटे, अमोल बारटक्के, संदीप धोकटे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमात नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी निवड झाल्याबद्दल कैलास विष्णू पंत धोकटे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. सर्व समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संघटक कैलास धोकटे म्हणाले की, "येत्या डिसेंबर २०२६ मध्ये दिल्ली येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे भव्य राष्ट्रीय महासंमेलन होणार आहे. आपला शिंपी समाज संपूर्ण देशात जवळपास १५ कोटी आहे. प्रत्येक राज्यात आपण वेगवेगळ्या पोटजातींमध्ये विभागले गेलो आहोत, परंतु आता एकत्र येण्याची वेळ आली आहे.
दिल्ली येथे होणारे हे राष्ट्रीय महासंमेलन हे संपूर्ण शिंपी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी एकजुटीने या महासंमेलनाच्या नियोजनासाठी काम करूया."

