भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे शिवसेना (शिंदे गट) ओबीसी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष रमेश नागनाथ बारसकर यांचा पंचायत समिती सदस्य विजय शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक सुनील पाटील, ओबीसी नेते शुक्राचार्य गवळी, अजित लिंगे,भिमराव शिंदे,सोमा शिंदे, सोमा पाटील, संतोष शिंदे,सुहास सराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रमेश बारसकर म्हणाले की, श्री संत सावता माळी महाराज यांच्या जन्मस्थळी माळी समाज बांधवांचा राज्यस्तरीय दिपावली पाडवा भव्य मेळावा शुक्रवार दि. 13/11/2026 रोजी संध्याकाळी 6=10 वाजता अरण ता. माढा जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून माळी समाज बांधवांनी एकत्र येऊन सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बारसकर यांनी केले.


