नागपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतभरातील शिंपी समाज व पोटजातींचे महासंमेलन येत्या नोव्हेंबर–डिसेंबर २०२६ मध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महासंमेलनाच्या आयोजन व नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी तसेच समाजबांधवांशी चर्चा करण्यासाठी नागपूर येथे आज, रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
संत शिरोमणी नामदेव महाराज स्मृती भवन मंदिर, नागपूर येथे दुपारी ३ वाजता ही सभा होणार आहे. सभेची सुरुवात संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने होणार असून, त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व दिल्ली येथे होणाऱ्या महासंमेलनाच्या आयोजन आणि नियोजनासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी वैष्णव शिंपी समाज, नागपूरचे अध्यक्ष सुरेंद्रजी सायखेडे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून रोहिला-टांक क्षत्रिय महासभा, दिल्लीचे प्रधान दयानंदजी रोहिला, खजिनदार . ईश्वर सिंह रोहिला तसेच अखिल भारतीय नामदेव महासंघ, दिल्लीचे कार्याध्यक्ष ज्वाला प्रसादजी नामदेव उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष व महासंमेलनाचे प्रभारी भास्कर टोपे, विदर्भ शिंपी समाज मंडळ भंडाराचे अध्यक्ष राजुभाऊ कीटे, नामदेव शिंपी समाज नागपूरचे अध्यक्ष प्रमोद कोरमकर, वै. शिंपी समाज नागपूरचे सचिव . श्यामजी नानोटे आणि कोषाध्यक्ष भाऊरावजी नानोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिल्ली येथे होणाऱ्या या महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन वैष्णव शिंपी समाज, नागपूर व विदर्भ शिंपी समाज मंडळ, भंडारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


