पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंगनजोड, नामनिळाचा, दंडपेट्या जोड, मोठा मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, इमिटेशन नेकलेस, मारवाडी मोत्याचा हार, लहान व मोठा शिरपेच, तुळशीची माळ, लक्ष्मी पदकासह लॉकेट, तोडे जोड, मत्स्य जोड आदी अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.

