भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल, भाळवणी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. नवनाथ खांडेकर व डॉ. सुषमा खांडेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या निंबाळकर तसेच शाळेचे अध्यक्ष व गुरुकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष सिताराम माने , संचालक, पदाधिकारी, पालक, महिला पालक, महिला शिक्षिका तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात देशभक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रप्रेम आणि एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

