चिखली प्रतिनिधी तेज न्यूज
“स्थानिक येवता ता. चिखली येथील प्रसिद्ध लेखक कवी, शिक्षक अनिल भगवान चव्हाण (ABC) यांना नुकतेच दि.12 जुलै 2026 रोजी शेगाव येथील द्वारका लॉन्स याठिकाणी राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संकल्प बहूद्देशीय संस्था अकोला व ग्रामीण युवा बहुद्देशीय संस्था तुलंगा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार अनिल चव्हाण यांना प्रा. संजय खडसे (उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी गजानन कांबळे नगरसेवक, प्रभाकर शेगोकार, (नगराध्यक्ष शेगाव )आकाश दादा सिरसाट अध्यक्ष सम्राट संघटना,संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र इंगळे, सचिव प्रतीक्षा वासनिक मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होता.
हा पुरस्कार प्रदान करतांना संजय खडसे साहेब म्हणाले की, अनिल असं समज मी तुलाच पुरस्कार देण्यासाठी आलोय.. माझा विद्यार्थी अनिल चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करतांना मला खूप आनंद होतोय अश्या भावना प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केल्या.
अनिल चव्हाण यांना हा 2026 वर्षातला तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.‘शोध सुखाचा’ हे त्यांच पुस्तकं प्रचंड गाजत असून ह्या पुस्तकामुळे अनिल चव्हाण यांच्यावर पुरस्कार आणि अभिनंदनाचा पाऊस पडताना दिसतोय.. ह्या पुरस्कार सोहळ्यास पाचशे पेक्षा जास्त लोकं उपस्थित होते.. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होतं आहे.”

