पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या संघटनात्मक फेररचनेत पंढरपूरचे सक्रिय कार्यकर्ते तमीम इनामदार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बार्शी येथे भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित 'युवाशक्ती जागर यात्रा' कार्यक्रमादरम्यान या निवडीची अधिकृत घोषणा करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
बार्शी येथील भव्य कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की, "भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार घेऊन आगामी काळामध्ये जनसामान्यांमध्ये, विशेषतः युवकांमध्ये पक्षाचे विचार रुजवण्यासाठी तमीम इनामदार नक्कीच प्रभावी काम करतील. सर्व युवकांना सोबत घेऊन सोलापूर पश्चिम भागात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करतील, हीच अपेक्षा आहे."
तमीम इनामदार यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल पंढरपूर-मंगळवेढा भागातील राजकीय वर्तुळातून आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निवडीबद्दल प्रशांत मालक परिचारक (माजी आमदार) समाधान दादा आवताडे (आमदार)प्रणव परिचारक (युवक नेते) यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तमीम इनामदार यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



