वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रात अशोक खरात नावाच्या भोंदू ज्योतिष्याने अनेक सुशिक्षित व्यापारी, अधिकारी, मंत्री आमदार खासदार यांना फसविले असतांनाच वर्धा जिल्ह्यातील अनेक स्वता:ला ज्योतिष्यचार्य म्हणवून घेणा-यांनी आपल्या दुटानदा-या थाटून सोशल मिडियावर ,पत्रके छापून, वर्तमान पत्रात जाहिराती देऊन राजरोसपणे अडचणीत सापडलेल्या ग्रहदोष सांगून रंगीबेरंगी रत्ने अंगठीत घालण्यासाठी पुजा विधी यज्ञयाग याव्दारे फसवणूक लुबाडणूक करणे सुरू असून विरोध केल्यास भावणा,बदनामी झाली असे म्हणून पोलिसांत तक्रार केली जाते या भोंदू ज्योतिष्या, ज्वेलर्स दुकानदार विरोधात व ते दावे करत असलेल्या विविध प्रकारच्या जाहिराती वर्धा जिल्ह्यातील पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समितीतर्फे यांच्या विरोधात कडक कार्यवाही जादुटोणा विरोधी कायदा व केन्द्रीय ग्राहक संरक्षण कायदा अन्तर्गत कार्यवाही करावी यासाठी मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून विनंती करण्यात आली.
ज्योतिष्याशास्त्राचा पाया हा जन्मवेळेवर आधारीत आहे मात्र १९८६ ला सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेत जन्मवेळ कोणती ग्राह्य धरावी यावर एकमत झाले नाही समारोपीय पत्रकार परिषदेत लोकांना फसवू नये असे आवाहन करण्यात आले होते तर जगातील १९८ नोबल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी सह्या करून ज्योतिष हे शास्त्र नाही तर तो ठोकताळे ,शक्य अशक्यतेच्या सिद्धांतावर आधारित असलेला व्यवसाय आहे ज्योतिष्य याला कोणताही वैज्ञानिक पाया नाही ज्योतिष्य हे निरीक्षण, तर्क अनुमान प्रयोग प्रचिती या विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येत नाही असे पत्रक प्रसिद्ध केले होते मात्र आज राजरोसपणे ज्योतिषाचार्य अशा पदव्या लावून राजरोसपणे लोकांच्या अज्ञानाचा,अगतिकतेचा, त्यांच्या अडचणींचा फायदा घेत तुमच्यावर शनी, राहू,केतू, गुरू,मंगळ यांची वक्रदृष्टी आहे त्यामुळे तुम्हाला सतत अपयश येत आहे हे ग्रहदोष दुर करण्यासाठी पाचू,मुंगा,निलम अशा विविध प्रकारचे रत्नांची अंगठी घालण्यास,ग्रहांची शांती करण्यासाठी यज्ञ याग कर्मकांड पुजा विधी करायला सांगून विशिष्ट ज्वेलर्स च्या दुकानातूनच हि रत्ने घ्या असा आग्रह धरल्या जातो ज्यात त्यांचे कमीशन असते यामध्ये लाखो रुपयांनी हे भुक्तभोगी बिचारे चिकित्सा न करता, विचार न करता फसले जातात हि धार्मिक बाब व याला श्रध्देचे वलय असल्याने कोणी फायदा न झाल्यास तक्रार करत नाही मात्र अशाही परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध करतात उलट त्यांच्यावरच भावणा दुखावल्या बद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस देतात हे ज्योतिषी पोलिस स्टेशनला तक्रार देतात.
वर्धेतील ज्योतिष्यचार्य म्हणवून घेणाऱ्या अरुणा अण्णाजी कोटेवार यांनी सोशल मिडीयावर सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होण्यासाठी विविध रत्ने यांचे फायदे कसे होतात याची जाहिरात केली ती कशी खोटी आहे याची माहिती व्दारकाताई ईमडवार यांनी सोशल मिडियावर देताच त्यांना भावणा दुखावल्या,बदनामी झाली या कारणांमुळे एक कोटी रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी नोटीस वकिला मार्फत देवून संविधानातील चिकित्सा करण्याच्या कर्तव्यावर बंधन आणणच्या व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला या विरोधात सर्व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बैठक घेऊन अशा प्रवृत्तींना प्रखर विरोध करून ज्योतिष कसे खोटे आहे कोणत्याही रत्नांचा फायदा कोणालाही होत नाही तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे दिलेले आव्हाण ज्योतिष्यांनी स्विकारावे अशा प्रकारचे प्रबोधन करण्याचा निर्णय हे फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य नसून प्रत्येक विवेकवादी संघटनेचे लोकांना शहाणे करण्याचे कर्तव्य आहे हे भारतीय संविधानातील ५१ अ कलमा अन्तर्गत कर्तव्य आहे ते प्रबोधनाच्या मार्गाने करावे दुसरीकडे चमत्काराचा प्रचार, प्रसार, प्रसिध्दी करणे ,असंभाव्य, विसंगत, दिशाभूल करणारे दावे करून लोकांना फसविणे, लुबाडणूक करणे ,दहशत निर्माण करणे यासाठी अस्तित्वात असलेल्या केन्द्रिय ग्राहक संरक्षण कायदा अन्तर्गत या सर्व ज्योतिष्य,ज्वेलर्स दुकानदार यांचेवर कडक कार्यवाही करावी यासाठी मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून विनंती करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, बुवाबाजी विरोधी विभागाचे प्रमुख भरत कोकावार,महिला विभागाच्या कार्यवाह व्दारका ताई ईमडवार,आयटकचे दिलीप उटाणे राष्ट्रीय युवा संघटनेचे ॲड दुर्गा प्रसाद मेहरे,मराठा सेवा संघाचे ॲड कपिलवृक्ष गोडघाटे,वकिल संघटनेचे ॲड गजानन पखाले,एकल महिला संघटनेच्या नुतन माळवी, लोकशाही आघाडीचे अतुल शर्मा,आम आदमी पक्षाचे शुभम ढवळे, महिला फेडरेशनच्या अनुराधा उटाणे,आशा वर्कर संघटनेच्या विजया पावडे,रिपाई जिल्हाध्यक्ष महेन्द्र मुनेश्वर,आरवाय एसचे प्रफुल्ल नागोसे,सिटूचे जिल्हा सचिव भैय्याजी देशमुख महाराष्ट्र अंनिस चे कल्पना सातव फुसाटे,मनिष फुसाटे जानराव नागमोते,सधाकर डडमल,मुल्यशिक्षण चळवळीचे दिलीप गुळघाणे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या वंदना कोळमकर,बचतगट संघटनेच्या उषा कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.



