विठूची पंढरी आषाढी वारी साठी झाली सज्ज
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम
आषाढी वारी निमित्ताने विठूची पंढरी आता पासून सज्ज झाली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.२५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी असून येत्या चार पाच दिवसात आळंदी वरुन ज्ञानेश्वर महाराजांची तर देहू वरुन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.२४ जुलै २०२६ दशमी दिवशी संध्याकाळी सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत.सर्व पंढरपूर व पंढरपूर कडे जाणारे रस्ते भाविकांनी गजबजून गेलेले असतात.पालख्या पंढरपूर मध्ये दाखल होताच वारकरी विखुरले जाऊन चंद्रभागा नदीत स्नान करून, विठ्ठलाचे दर्शन,व प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.नंतर मिळालेल्या वेळेत प्रासादिक वस्तू खरेदी करताना दिसतात.पंढपूरातील लहान मोठे व्यावसायिक आपल्या दुकानात वस्तू भरुन ठेवत आहेत.खेळणीची दुकाने, प्रासादिक दुकाने,पेढे,बताशे, चुरमुरे, अगरबत्ती, हळदी कुंकू,अबीर गुलाल,टाळ, मृदंग, भक्तीची पुस्तके, चहा, नाष्टा, उपवासाचे पदार्थ,फळे,बांगड्या,चुडे, देवांचे फोटो, मूर्ती, तुळशी माळा,अशा अनेक प्रकारची दुकाने भरगच्च भरलेली,सजलेली
आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांच्या निदर्शनास आली आहेत, स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, पाणी खाते,पी,डब्ल्यू,डी.विभाग, जिल्हा परिषद, परिवहन महामंडळ, पोलीस, होमगार्ड, नगरपरिषद, वगैरे वगैरे विभागात आषाढी वारी ची जय्यत तयारी करण्यात आली आहे.एकंदरीत आषाढी वारी साठी विठू ची पंढरी सज्ज झाली असल्याचे चित्र दिसत आहे.


