पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या दि.२५/०४/२०२६ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र. ८ अन्वये मध्य विभाग विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर व शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.
संस्थेच्या कार्यात आपले वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. विभागीय समन्वय समितीचे सदस्य या नात्याने संस्थेच्या कार्यात आपण अधिक सक्रीय सहभाग द्यावा, अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था सातारा सचिव विकास देशमुख यांनी सांगितले आहे.
हि निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रेमी ग्रामस्थानी संभाजी शिंदे यांचा सत्कार केला.
यावेळी अंकुश डबाळ,आनंद देशपांडे,पोपट इंगोले, उपसरपंच नितीन शिंदे, सेवनिवृत्ती तलाठी धोंडीराम शिंदे, प्रवीण शिंदे,रामचंद्र सावंत, लुकमान इनामदार,प्रशांत माळवदे,मोहन भोसले, दत्ता लोखंडे,पवन शिंदे,महेश शिंदे,शिवाजी लोखंडे, बबन साठे, सहदेव लोखंडे, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आभार ऋतुराज शिंदे यांनी मानले.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की, मी आज पर्यंत प्रामाणिकपणे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स या विदयालया कारिता जे काम केले आहे. त्या कार्याची दाखल घेऊन संस्थेने माझी निवड केली आहे. मी यापुढे ही माझे शैक्षणिक कार्यासाठी सहकार्य राहील. असे शिंदे म्हणाले.
या निवडीबद्दल संभाजी शिंदे यांचे व्यक्तीशः व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


