भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावातील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या गाठीभेटी घेण्यासाठी कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाळवणी गावास भेट दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवान चौगुले, सहकार महर्षीचे संचालक विजय कदम, उपसरपंच नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावभेटीदरम्यान रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तेज न्यूज परिवारासही सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मातोश्री कुसुम माळवदे यांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस करून आरोग्यविषयक चर्चा केली.
या भेटीबद्दल तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे आभार मानले.

