पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अनवली (ता.पंढरपूर) येथे लिंबाच्या झाडाखाली जुगार खेळताना सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी धाड टाकून 8 जणांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून 56,550 रू. रोख रक्कम, 5 मोबाईल, पत्याची पाने, 5 दुचाकी मोटार सायकल असा एकुण 3 लाख 86,550 रूपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि. 8 रोजी सायंकाळी 5.30 वा. घडली आहे.
दि.8 रोजी प्रशांत डगळे सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांना अनवली (ता.पंढरपूर) येथील गायरानामध्ये पाण्याचे टाकीजवळ येथे काही इसम मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने 5.30 वा.छापा टाकला असता, एका लिंबाच्या झाडाखाली मोकळया जागेत काही इसम गोलाकर बसुन मन्ना नावाचा पत्याचा जुगार खेळत असल्याचे दिसले. त्यांना गराडा घालून जागीच पकडले. त्यांच्या समोरच वेगवेगळया दराच्या नोटा पडलेल्या दिसल्या.
पकडलेल्यांमध्ये महादेव पांडुरंग रूपनर (वय 34) रा. अनवली, हरी वासुदेव कुंभार (वय 39) रा. चळे, योगेश शामराव ढोले (वय 28) रा. रांझणी, अनिल साधू डिसले (वय 56) रा.अनवली, उमेश विठठल कोळी (वय 38) रा. बठाण, प्रविण ईश्वर कांबळे (वय 37) रा. गोपाळपूर, सोमनाथ दिलीप गुंड (वय 35) रा. गोपाळपूर, ज्ञानेश्वर नामदेव गांजाळे, रा. अनवली (फरार) अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून 56,550 रू. रोख रक्कम, 5 मोबाईल, पत्याची पाने, 5 दुचाकी मोटार सायकल असा एकुण 3 लाख 86,550 रूपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. पकडलेल्या 8 आरोपी विरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पो.ना. काकडे यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रोंगे, पोकॉ हुलजंती, पोकॉ सावंत, पोकॉ कुचेकर, पोकॉ घायाळ, पोकॉ लोंढे यांनी पार पाडलेली आहे.


