दुःखाचे स्वराशी नाते जोडणारा महान गायक.. मुकेश.
२२जुलै१९२३ रोजी मुकेशचा जन्म दिल्ली मध्ये झाला.सुरुवातीला बांधकाम खात्यात काम केले सन १९४० साली मुकेशनी चित्रपटात पदार्पण केले.पहिली नजर चित्रपटातील " दिल जलता है तो जलने दे,ऑंसु ना बहा,फरियाद न कर,दिल जलता है...."या सैगल च्या आवाजाची प्रतिकृती असलेले दर्दभरे गाणे मूकेशने गायले,त्या वेळी स्वतः सैगल व त्यांच्या चाहत्यांना चक्रावल्या सारखे झाले, पुढे पुढे मुकेश नी स्वतः च्या आवाजात गायला सुरुवात केली.बांसरी या चित्रपटाच्या वेळी पृथ्वीराज कपूर ने मुकेश ची ओळख आपला मुलगा राज कपूर बरोबर करून दिली.तेव्हापासून मुकेश व राज कपूर ची मैत्री झाली.राज कपूर मुकेश ला नेहमीच मुकेश चंद्र म्हणायचं.त्यांचे खरे नाव मुकेश चंद्र माथुर असे होते.मुकेशनी " निर्दोष" या हिंदी चित्रपटा साठी अभिनय केला." दुःख सुख" ,"आदाब अर्ज" या ही चित्रपटातून कामे केली आहेत.पुढे मल्हार,माशुका, आणि अनुराग या चित्रपटाची निर्मिती केली.सन१९४५ मध्ये मूर्ती या चित्रपटा साठी आपला आवाज उसना दिला.पुढे त्यांनी दिलीप कुमार ते जयराज अशा अनेक अभिनेत्यांना आपला आवाज दिला.आवारा, अनाडी,पहचान मधील गायनासाठी मुकेश ला फिल्म फेअर पारितोषिक मिळाली,रजनी गंधा मधील गायनासाठी मुकेश ला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते.त्या काळातील चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अवाढव्य व्यक्तिमत्त्व असलेले मोतीलाल यांनी मुकेश ला मुंबई ला आणले, त्यांच्या मदतीने मुकेश ला सुरुवातीच्या काळात चित्रपट सृष्टीत स्थान मिळाले,खरे तर मुकेश अभिनय क्षेत्रात काम करुन अभिनेता बनण्यासाठी आले होते,पण त्यांचे अभिनय असलेले चित्रपट धडाधड साफ कोसळले, तेव्हा पासून अभिनय क्षेत्राकडून गायन क्षेत्राकडे वळले,
बडे आरमानोसे रखा है,
बलम तेरी कसम,
प्यार की दुनिया में,
यह पहला कदम.
सुंदर शब्द, सुंदर चाल, सुमधुर संगीत व सहगायिकेची साथ यामुळे हे गाणे प्रक्षेकांना आजही ठेका धरायला लावते,
मेरे मन की गंगा,
और तेरे मन की जमुना का,
बोल राधा बोल संगम
होगा की नहीं.
हे संगम मधील राज कपूर आणि वैजयंतीमाला यांच्या वर चित्रीत केलेल्या गाण्याला मुकेश ने आपल्या खोडकर आवाजाने अमर करून ठेवले आहे, या गाण्याच्या चालीवर आजवर अनेक लोक गीते तयार झाली आहेत.संगम मधील दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, या धीरगंभीर गाण्याने मात्र प्रेक्षकांना हुरहूर लावली.मुकेशच्या आवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वर, शब्द, अगदी हृदयापासून निघून थेट हृदया पर्यंत भिडायचे, स्वरात दर्द भनायक दाटलेला असायचा,
हम तुझसे मोहब्बत करके सनम,
हसते भी रहे,रोते भी रहे.
दिवानोंसे यह मत पुछो,
जिस गली मे तेरा घर ना हो बालमा
ते मेरा दिवानपण है,
कोई जब तुम्हारा हृदय तोड दे,
वक्त करता जो वफा आप हमारे होते,
जुबां पेज दर्द भरी दास्ता चली आई.
वो तेरे प्यार का गम एक बहाना था सनम,
हम छोड चले है महफिल को ,
तुम जो हमारे मित ना होते,
आया है याद मुझे गुजरा जमाना बचपन का,
सुहानी चांदनी राते हमे सोने नहीं देती,
तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से,
जाऊं कहा बता ते दिल, दुनिया बडी संगदिल.
अशी मुकेश ची गाणी ऐकताना मन आजही थरारुन जाते.ह्ददयात खोलवर दुःखद कळ येते, हृदय भरून येते, अशी खूप गाणी मुकेश नी गाऊन अजरामर केली आहेत.मुकेशचे सरल नावाच्या मुलीशी प्रेम जुळले,पण दोन्ही घरातून कडाडून विरोध झाला, शेवटी मोतीलाल यांनी पुढाकार घेऊन कन्यादान केले, लता दीदी, हृदयनाथ मंगेशकर यांच्या बरोबर गाण्यासाठी मुकेश मॉन्टि्यलच्या कार्यक्रमात गेले, मुकेश ला अस्वस्थता वाटू लागल्याने गाता येईना, त्यावेळी मुकेश चा मुलगा नितीन मुकेश हा रंगमंचावर आला व कभी कभी मेरे दिल में खयाल आता है,हे गाणे गाऊ लागला,हे पाहून मुकेश च्या डोळ्यातून अश्रू ओघळले, हृदयनाथ मंगेशकर यांना जवळ बोलावून नितीन ला सांभाळा असे सांगून मुकेश नी जगाचा निरोप घेतला,तो दिवस होता २७ आगस्ट १९७६.अशा महान गायकाच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन.
लेखन - भारत कवितके मुंबई

