अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
स्वामी सेवेशी अखंडपणे जोडले गेलेले व्यक्तीमत्व जेव्हा भक्तांमध्ये येते तेव्हा तेथील वातावरणात वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते असे भावोद्गार कोल्हापूर येथील स्पीड न्यूज २४ चॅनल व कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचे प्रमुख स्वामीभक्त सुहास पाटील यांनी व्यक्त केले.
येत्या रविवारी कोल्हापूर येथे
स्पीड न्यूज २४ चॅनल व कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा परिवार यांच्या वतीने कोल्हापूर शहर व परिसरातील स्वामी भक्तांच्या वतीने येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण
महासोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांना देण्यास उपस्थित असताना या स्वामी भक्तीच्या (महासागरास) नामस्मरण सोहळयास संबोधीत करताना स्वामी भक्त सुहास पाटील बोलत होते.
पुढे बोलताना स्वामी भक्त सुहास पाटील यांनी या सोहळ्यास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश कल्याणराव इंगळे यांची लाभणारी प्रमुख उपस्थिती म्हणजे भक्तांसाठी स्वामी सेवेतील एक अखंड वाहता झरा पाहण्याचा व अनुभवण्याचा एक जागृत अनुभव असणार आहे. स्वामींच्या कार्यासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या अशा सेवेकऱ्यांचे आगमन म्हणजे भक्तांसाठी प्रेरणा सेवाभावाचा आदर्श आणि स्वामीकृपेची अनुभूतीही या महा सोहळ्यात स्वामी भक्तांना अनुभवता येणार आहे. यावेळी उपस्थित स्वामी भक्तांच्या सेवेत महाराजांचे दर्शन, पादुका दर्शन, अखंड सामुदायिक नामस्मरण, स्वामी भक्तांचा महामेळावा, स्वामींचा महाप्रसाद - भोजन इत्यादी सेवा महाराजांच्या चरणी अर्पण होणार आहेत, तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी भक्त सुहास पाटील यांनी केले आहे. यावेळी कोल्हापूर येथील नारायण यादव, मनोज माने, रमेश माने, रविंद्र पाटील, अभिजित पाटील, वेणूताई सुतार, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते.
हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानले जाते. अधिक मास हा आत्मशुद्धी, भक्ती आणि ईश्वर चिंतनाचा महिना आहे. या काळात श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू आणि भगवान विष्णू यांच्या भक्तीला विशेष महत्व दिले जाते. अधिक महिन्यात केलेली भक्ती अनेक पटींनी फळ देते, म्हणून या पवित्र अधिक महिन्यात भक्तांकडून नामस्मरण, सेवा आणि सत्कर्म सेवा व्हावा या उद्देशाने रविवार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजता दत्त समर्थ सांस्कृतिक भवन आंबेवाडी-कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सामुदायिक नामस्मरण महासोहळ्याचे आयोजन कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हा स्वामी भक्तीचा सोहळा कोल्हापूर व परिसरातील भाविकांसाठी निश्चीतच स्वामी कृपेचा सोहळा आहे - श्री.महेश कल्याणराव इंगळे - चेअरमन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट)


