पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा (पदविका) इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ची मान्यता मिळाली असून बुधवार (दि.२० मे २०२६) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया सोमवार दि. २२ जून २०२६ पर्यंत चालणार आहे.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
सन २०२६-२७ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा.संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर क्र.-६४३७) म्हणून स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयास मान्यता दिली आहे.
पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे यंदाचे हे १७ वे वर्ष आहे. स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सदरच्या रजिस्ट्रेशनची प्रकिया दि. २० मे २०२६ पासून ते दि. २२ जून २०२६ सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. दिलेल्या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे.
डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. एस. एस. गायकवाड (९८९०५६६२८१) व प्रा. जे. बी. रोडगे (९७६७८५६०२९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत असून मार्गदर्शन करण्यासाठी उच्चशिक्षित प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.



