वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
वेळापूर येथील इंद्रनिल मंगल कार्यालय या ठिकाणी भाजप नेते विक्रमसिंह माने-देशमुख यांचे नेतृत्वात शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ मेळावा आयोजित करण्यात आला.आमचे मार्गदर्शक,ॲड एम एम मगर,( वकील साहेब) निमगाव.महाराज देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अमृतराज सूर्यकांत माने देशमुख.विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने-देशमुख,माजी जि.प.सदस्य बाळासाहेब धाईंजे, ओबीसी सेल मंडळ अध्यक्ष काकासाहेब जाधव,पत्रकार निनाद पाटील,मदन माने-देशमुख, शेतकरी संघटनेचे गोपाळ काका घाडगे,राहुल माने-देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण,श्रीधर देशपांडे, श्री संदीप तात्या माने देशमुख,संजय पनासे,माळेवाडी शहर अध्यक्ष नवनाथ साठे, शहर उपाध्यक्ष पंढरीनाथ बनकर आदी सहभागी झाले.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन एम एम मगर वकील साहेब, निनाद पाटील, मदनसिंह माने देशमुख,गोपाल काका घाडगे, बाळासाहेब धाईजे, काका जाधव, उमेश माने देशमुख, संदीप तात्यामाने देशमुख, गणेश चव्हाण, यांनी आपले विचार व्यक्त केले.
या दरम्यान विक्रमभाऊ माने देशमुख यांनी या सगळ्या मागण्या एकत्रित करून त्याचा पाठपुरावा केला जाईल जेणेकरून शेतकऱ्यांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.वेळापूर सह जांभूड, माळखांबी,विठ्ठलवाडी,उघडेवाडी, निमगांव म ,इतर गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकी दरम्यान शक्तीपीठ महामार्गा विषय फायदे व तोटे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प कसा असणार यांची देखील माहिती देण्यात आली,
यावेळी बाधित शेतकऱ्यांमधुन समर्थन देण्यात आले परंतू विविध मागण्या मांडण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने बाधित शेतकर्यांना देण्यात येणाऱ्या मोबदला हा अधिक असा अशी मागणी करण्यात आली.


