अकलूज प्रतिनिधी केदार लोहेकर तेज न्यूज
नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री नृसिंह जयंती व नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले.दि.२२ एप्रिल ते २ मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये धार्मिक कार्यक्रमा बरोबर सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवात दररोज सकाळी सनई चौघडा वादन, विष्णुसहस्त्रनाम, पंचामृत,विविध जिल्ह्यातून आलेल्या भजनी मंडळ,प्रवचन, नादब्रह्म भक्ती संगीत,कीर्तन, अभंगवाणी,सुगम भक्ती संगीत, भावगंध संगीत,शहनाई वादन, रंगसप्तक,कुचीपुडी नृत्य यांनी आपली भक्तीमय सेवा सादर केली तर नृसिंह जयंती दिवशी समर्थभक्त राघवेंद्र देशपांडे (डोंबवली) यांचा बहारदार कीर्तनाचा कार्यक्रम सादर केला.यावेळी देवस्थानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डोळे तपासणी व दंत चिकीत्सा करण्यात आली व या शिबीरात मोफत चष्मांचे वाटप करण्यात आले.
तर १ मे रोजी श्रींची पालखी मिरवणूक नीरा नरसिंहपूर गावातून वाजत गाजत विविध पारंपरिक वाद्य,लेझीम व रंगीबेरंगी फटाक्यांची अताषबाजी, पारंपारिक खेळ लाठीकाठी व विविध खेळांनी हि मिरवणूक पार पडली तर २ मे ह.भ.प.अंकुश सुखदेव रणखांवे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी संपुर्ण महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून लक्ष्मी-नृसिंह मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.हा नवरात्र उत्सव शांततेत पार पडला.
हा नवरात्र उत्सव पार पाडण्यासाठी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त व विश्वस्त मंडळ,सर्व ब्रह्मवृंद, देवस्थान ट्रस्टचे सर्व कर्मचारी तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामपंचायत सरपंच,सर्व ग्रामस्थ श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर यांनी परिश्रम घेतले.


