पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वाखरी येथील माईर्स एमआयटी पुणे संचालित विश्वशांती गुरुकुल ज्युनियर कॉलेजचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेत वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के व विज्ञान शाखेचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेतील पियुष साळुंखे याने ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याने अकाउंट्स व गणित विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सायली ढेकळे हिने ९३.६७ % गुण मिळवत द्वितीय तर तन्वी खपाले ८९ % गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. याशिवाय इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पारस शेठ ८७.१७ %, सोहम बहुरूपी ८७ %, प्रवीण चौधरी ८७%, ओंकार लगड ८६.३३ % आणि परिनिता आवताडे ८६ % यांनीही विशेष प्राविण्य मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यशाबद्दल हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी, प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ तसेच शिक्षक व व्यवस्थापनाने सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून, विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असल्याचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी सांगितले.


