कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक 15 एप्रिल रोजी वाठार तळसंदे रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातात वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई व ९ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना CPR कोल्हापूर येथे दाखल करून पुढील उपचारासाठी कणेरी मठ सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनुलोम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. उपचारासाठी आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. विशेषतः मुलीचे नाव रेशन कार्डवर नसल्याने प्रक्रिया अडकली होती.
या वेळी निवासी तहसीलदार चव्हाण सर यांनी तातडीने हस्तक्षेप करून रेशन कार्डवर नाव समाविष्ट करून दिले व आवश्यक उत्पन्न दाखला उपलब्ध करून दिला. त्यामुळे उपचारासाठी लागणारी सर्व कागदपत्रे वेळेत पूर्ण झाली.
या संपूर्ण कार्यात अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते, डॉक्टर, प्रशासन व सर्व संबंधितांनी अत्यंत संवेदनशीलतेने सहकार्य केले.
हे कार्य माणुसकी जिवंत असल्याचे जिवंत उदाहरण असून प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

