नवीन लग्न झालेल्या लेकीची झाडांच्या रुपाने राहणार कायम आठवण
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब गावच्या लेकीचं अभियान टीमच्या वतीने वृक्षारोपण मोहिम सुरू असताना चालू वर्षी २५० झाडांचा टप्पा पूर्ण करत गेल्या तीन वर्षात १००० झाडांचं संवर्धन सुरू आहे.आणि याच माध्यमातून बुधवारी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला नवदाम्पत्य चि.रोहन मेणकुदळे आणि सौ.वैष्णवी शेटे यांचा शुभविवाह दिमाखात संपन्न झाला.
त्याचे औचित्य साधून आज करकंब गावची लेक वैष्णवीच्या नावाने वटवृक्षाचे झाड लावून कायम स्वरुपी तिची आठवण राहावी या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले.यानिमित्ताने का होईना पर्यावरण रक्षणासाठीचा उद्देश सफल होत असताना दिसत आहे. पुढील काळात ही प्रत्येक नवदाम्पत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन लेकीच झाड टीमच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी संतोष शेटे कविता शेटे सुनील शेटे शारदा शेटे राजेश मेणकुदळे सविता मेणकुदळे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी करकंब गावच्या लेकीचं अभियान टीम चे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे विशाल बोधे, देविदास काटवटे, विश्वजीत शिंदे.नागेश खारे.चेतन पुरवत, यावेळी उपस्थित होते.