शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव कटीबद्ध:- गटविकास अधिकारी अमोल जाधव
अधिकारी आणि शिक्षकांचा समन्वय साधून विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार:-गटशिक्षणाधिकारी रोहन कांबळे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका शिक्षक समितीच्या वतीने पंढरपूर पंचायत समितीमध्ये नवनियुक्त गटविकास अमोल जाधव तसेच नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी रोहन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे तालुकाध्यक्ष रमेश खारे यांच्या शुभहस्ते नूतन गटविकास अधिकारी श्री अमोल जाधव साहेब यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील कोरे यांनी न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षक समिती पहिल्यापासून शिक्षकांच्या अडीअडचणी व त्यांच्यावर होणारा अन्याया दूर करणेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी सदैव प्रयत्न करीत आहे.आपण शिक्षकांचे कुटुंबप्रमुख गटविकास अधिकारी आहात. गटशिक्षणाधिकारी यांचा समन्वय साधून शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोलाचा वाटा असणार आहे. आज पंढरपूर तालुक्यास नवीन तरुण अधिकारी मिळाल्याने गुणवत्ता अधिक वाढणार असे मनोगत व्यक्त करून शिक्षक समितीची संघर्ष गाथा साहेबांना सांगितली.
सत्कारास उत्तर देताना गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे योगदान अतिशय मोठं आहे.त्यांच्या ज्या ज्या अडचणीक्ष व प्रश्न असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन असे मनोगत व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्याचे नूतन गटशिक्षण अधिकारी रोहन कांबळे यांचा जिल्हा उपाध्यक्ष पोपट कापसे व तालुका नेते नवनाथ कवडे यांच्या शुभहस्ते स्वागतपर सत्कार करण्यात आला.
जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे व तालुकाध्यक्ष रमेश खारे यांनी शिक्षक समिती एक लढवय संघटना असून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रथम आंदोलने व उपोषण करणारे संघटना आहे. अशी मनोगत व्यक्त करून भविष्यात संघटना व प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे व पंढरपूर तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांक व आणावा असे मत व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी रोहन कांबळे यांनी शिक्षक संघटना आणि प्रशासन यांचा समन्वय साधून शिक्षकांच्या सहकार्याने पंढरपूर तालुक्याची जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतील आणि त्या ला सर्व शिक्षकांनी सहकार्य करून पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट कापसे माजी राज्य संघटक अनिल बंडगर साहेब जिल्हा संघटक सुनील गाडे महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा व चेअरमन श्रीमती सुरेखा इंगळे.पंढरपूर शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष रमेश खारे. तालुका नेते नवनाथ कवडे.तालुका प्रवक्ते सुनील ननवरे. उपाध्यक्ष सत्यवान जाधव. बाळासाहेब खांडेकर. शिवाजी जाधव. उमेश तारापूरकर.सुरसेन बुद्धवंतराव.संतोष कापसे.विष्णू नरळे.आवेश करकमकर, अशोक कांबळे, विजय जाधव,हेमंत माने,अण्णासाहेब रायजादे,सोमनाथ पवार,ज्ञानेश्वर दुधाणे.उदय भूमकर.संतोष थोरात. शरदचंद्र चट्टे.आप्पासाहेब नरळे.जगन्नाथ ओव्हाळ. सारिका फासे .स्वाती शहाणे. वैशाली वाघमारे .सुजाता गुरसाळकर.मंजिरी देशपांडे. सचिव मुकेश कोळी आदी शिक्षक समितीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार तालुकाध्यक्ष रमेश खारे यांनी मानले.

