सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला पुरस्कार आणि प्रांतपाल यांची क्लबला अधिकृत भेट संपन्न झाले.सुरूवातीला क्लबचे अध्यक्ष लायन मोहन भुमकर घंटानाद केले, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रांतपाल एम.जे.एफ अॅडवोकेट लायन मल्लीनाथ पाटील, प्रथम महिला सौ लायन महादेवी पाटील,लायन अध्यक्ष मोहन भुमकर ,सौ भारती भुमकर, श्री मुरलीधर अरकाल, श्री प्रकाश हत्ती, श्री गणेश शालगार, सौ नमिता थिटे, श्री विद्याधर शाबादी, अंबादास इंदापुरे, यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि सत्कार लायन मोहन भुमकर यांनी केले
यावेळी यशस्वी महिला पुरस्कार प्राप्त महिला. सौ शारदा नोरा , सौ राजश्री तडकासे, सौ शशिकला श्रावण, सौ रेश्मा मेटगिरी, सौ गंगाबाई गुडूर, सौ शिल्पा बल्ला. यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृती चिन्ह बुके देऊन गौरविण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर राजश्री तडकासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच अॅडवोकेट श्री रामचंद्र मेत्रस यांनी कायदे विषयक माहिती दिली.लायन्सचे प्रांतपाल एम.जे.एफ लायन अॅडवकेट मल्लीनाथ पाटील यांनी लायन्स क्लब माहिती, पुरस्कार प्राप्त महिला आणि क्लबचे अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांचे कौतुक करून शुभेच्छा दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल भुमकर, विजय श्रीगिरी, सुरेश श्रीगिरी, बाबू चव्हाण, पांडुरंग बारड, माणिक भूमकर, यांनी परीश्रम घेतले,आभार प्रदर्शन लायन सोमशेखर भोगडे तर सुत्रसंचलन सौ श्रीदेवी यळमेली यांनी केले.