भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्यूज चॅनेलच्या वतीने व्याख्याता पूजा गणेश गायकवाड यांचा महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष राजश्री ताड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पेन,डायरी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्राची प्रशांत माळवदे उपस्थित होत्या.
यावेळी पूजा गायकवाड म्हणाल्या की ग्रामीण भागातील, आपल्या परिसरातील सर्वात मोठी व जलद बातम्याना प्रसिद्धी दिली जात आहे. यापुढे ही आपल्या बातम्यास मोठी प्रसिध्दी मिळत राहो हीच पांडूरंग चरणी प्रार्थना.
यावेळी आभार प्रीती माळवदे यांनी मानले.