ग्रामीण भागातील गुणवंत आणि गुणवत्तापूर्ण आघाडीवर असणारी शाळा जळोली:-गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे
जळोली प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब बोलत होते.सुरुवातीला गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब सरपंच जोतीराम मदने .उपसरपंच विमल थोरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब नरसाळे.उपाध्यक्ष शहाजी नरसाळे.समाधान नरसाळे.मनोज नरसाळे.रविंद्र नरसाळे.तानाजी नरसाळे.संतोष नरसाळे.गोरख नरसाळे.रमेश थोरात.दादा शिंदे.माऊली मगर.नागन्नाथ शिंदे.केंद्रप्रमुख पा.वा.जाधव.शिक्षक नेते ज्योतीराम बोंगे.चेअरमन रामभाऊ यादव.कार्याध्यक्ष सुनील कोरे मुख्याध्यापक गणपत मोरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करत प्रास्ताविक मुख्याध्यापक गणपत मोरे यांनी करत शाळेचा चढत्या आलेखाची माहिती दिली.कार्यक्रमाला सुरुवात झाली.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात लहानचिमुकल्यांनी केली त्यानंतर एक से बडकर गाण्याचे सादरीकरण केले त्यामध्ये चंदाराणी.शेतकरी गीत.हुंडा गीत.व्यसनमुक्ततेवरील सुंदर नाटिका.एकच राज.मदन मंजिरी.भिमराव आंबेडकर.शिवकन्या.शेवटी देशभक्तिपर गीतांवर सुंदर नृत्य करत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करतात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब जोतीराम मदने .रामभाऊ यादव.सुनिल कोरे.यांनी चिमुकल्यांनी केलेला नृत्याविष्कार पाहून शुभेच्छा देत सर्वच क्षेत्रात जळोली शाळा नेहमीच आघाडीवर असून त्यामध्ये टॅलेंट हंन्ट.क्रिडास्पर्धा.स्पर्धापरीक्षा आदी क्षेत्रात सदैव आघाडीवर राहून ग्रामीण भागातील या शाळेने दबदबा निर्माण केला आहे.सांगत शूभेच्छा दिल्या.सुत्रसंचलन जयवंत कापसे सरांनी केले.आभार सोमनाथ पवार सरांनी मानले.
हा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गणपत मोरे.जयवंत कापसे.रमेश खारे.शिवाजी गोरे.सिध्देश्वर लोंढे सोमनाथ पवार.कैलास नरसाळे.विशेष परिश्रम देवकी कलढोणे-दुधाणे संतोष थोरात तसेच उंबरे शिक्षक शिक्षिका यांनी घेत वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी केले यावेळी पालक उंबरे करकंब भागातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.