पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनचा मेळावा वाखरी तालुका पंढरपूर येथे युनियनचे राज्याध्यक्ष मोहन लामकाने प्रदेश सरचिटणीस दिलीप जाधव सोलापूर जिल्हा सचिव बालाजी पवार जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम नागणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची एकजूट महत्वाची असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटले जाणार नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत परंतु सदर शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी पंचायत समिती स्तरावरून होत नाही म्हणूनच एकत्र येऊन संघटना मजबूत करावी असे आवाहान राज्याध्यक्ष मोहन लामकाने यांनी केले.
यावेळी युनियनच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष जितेंद्र पोरे ग्रामपंचायत वाखरी राहुल शिंदे तालुका उपाध्यक्ष ग्रामपंचायत भाळवणी यांच्या नव्याने निवडी करण्यात आली
त्यांना निवडीचे पत्र राज्याध्यक्ष मोहन लामकाने यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव बालाजी पवार विशाल देशमुख दाजी पाटोळे अनिल गायकवाड सोमनाथ मोरे परमेश्वर लोंढे जगन्नाथ गुरव लक्ष्मण वाघमोडे विठ्ठल लोखंडे अंबादास सुनील यमगर पंडित रणपिसे शंकर वाघमारे व पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.