पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळवे येथे mpsc मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन विविध पोस्ट मिळवणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,त्यामध्ये गादेगाव ची सुकन्या कु.प्रतीक्षा दत्तात्रय बागल हिची मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड झालेबद्दल,तर पिराची कुरोली चे सुपुत्र चि.सनम अर्जुन लामकाने यांची समाजकल्याण सहाय्यक पदी निवड झाल्याने,तसेच शेळवे गावचे सुपुत्र ची.स्वामी बिभीषण आसबे यांची अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून टॅक्स असिस्टंट व महसूल सहाय्यक पदी निवड झालेबद्दल सन्मान करण्यात आला.
सर्व यशस्वी अधिकाऱ्यांचा व त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहणाऱ्या आई-वडिलांचा प्रशालेच्या वतीने यथोचित सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.
स्वामी आसबे यांनी आपल्या मनोगतातून शेळवे येथील सणराईज प्रशाला विध्यार्थी घडवण्यासाठी नियमित धडपड करत असते,प्रशालेचे स्पर्धापरीक्षा मधील योगदानामुळे मागील दहा वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याचा टक्का वाढला त्यामुळेच सणराईज पॅटर्न नावारूपास येत असल्याचे त्यांनी सांगितले,हेच प्रशालेचे वैशिष्ट्य आहे, तर सनम लामकाने यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेऊन स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाजवळ आणण्यासाठी प्रशालेचे जे प्रयत्न चालू आहेत ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले, कु. प्रतिक्षा बागल यांनी आपल्या मनोगतातून,कठीण परिश्रम, जिद्द, त्याग हिच यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले..
कार्यक्रमाच्या प्रसंगी शेळवे गावचे जेष्ठ नागरिक विठ्ठल मारुती गाजरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब (बापू) गाजरे,पिराची कुरोली चे ग्रामपंचायत सदस्य अनिल लामकाने,आबासो लामकाने ,शंकर खपाले,संतोष गाजरे,समाधान भैय्या गाजरे,बाबासाहेब पवार, बळीराजा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रकाश गाजरे, गादेगाव चे सामाजिक चळवळीतील नेते व प्रतिक्षा बागल हिचे वडील दत्ताभाऊ बागल,शेळवे येथील जेष्ठ नागरिक चि.स्वामी यांचे पालक बिभीषण व सौ. सीताबाई आसबे ईत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले तर आभार संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी मानले, कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक रामचंद्र मोकळे, संगीत व कला शिक्षक योगेश गायकवाड,प्रशालेचे अकाउंटंट कबीर शेख तसेच सर्व अध्यापक वृंद, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.