पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत दि. १३/०२/२०२५ रोजी बडीरात बंदोबस्ताचे अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना साधारणतः २२:१५ वा चे सुमारास जुना अकलुज रोड, डी मार्टकडे जाणारे रोड जवळ पेट्रोलींग करीत आले असताना एक इर्टीगा गाडी नं. एमएच ०७ एस ३६९९ संशयास्पद रितीने थांबलेली दिसली. सदर वाहनाची पाहणी केली असता इटिंगा गाडीत पाठीमागे ही खाकी कागदात चिकटपट्टी लावुन गुंडाळलेले ०६ बॉक्स दिसले सदर बॉक्स जवळ जावुन ते हातात घेवुन पाहिले असता त्याचा उग्र वास येवु लागल्याने त्या बॉक्स मध्ये गांजा आहे असे समजले.
सदर गाडीमध्ये दोन इसम होते त्यांची नावे रोहन शंकर - चव्हाण आणि त्याच्या सोबतच्या रोहित प्रकाश कांबळे दोघे रा. बावडा ता. इंदापुर जि. पुणे असे असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करून त्यांचे विरूध्द एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क) २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई मध्ये एकुण १) २,४५,४४०/- रु किंमतीचा अंमली पदार्थ गांजा २) ८,००,०००/- एक पांढरे रंगाची इर्टीगा गाडी नं. एमएच ०७ एस ३६९९ इंजीन नंबर D13A1861604 तसेच चेसीस नंबर MA3FLEBAS00108106 असा असलेली आवा किअं.असा एकुण १०,४५,४४०/- रू किंमतीचा गांजा व वाहन जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, कल्याण ढवणे पोहेका ३९६ सुरज हेंबाडे, पोहेका ३९८ सिरमा गोडसे, पोहेकॉ २२१ प्रसाद औटी, पोहेकॉ १७८९ सचिन हेंबाडे, पोहेकॉ १२५५ विठठल विभुते, पोना /१७३६ सचिन इंगळे पोशि १९०४ निलेश कांबळे, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोशि १५१३ बजिरंग बिचुकले तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण चे पोशि रतन जाधव यांनी केली आहे.