अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
अक्कलकोट शहरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी, नागरिक तसेच मूक जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील शाही ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली.
यावेळी दोन रकात विशेष नमाज पठण करण्यात आली. त्यानंतर खुतबा आणि पावसासाठी सामूहिक दुआ करण्यात आली. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाचे आगमन होऊन शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न दूर व्हावा, यासाठी यावेळी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

