भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील परफेक्ट कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 16/ 2/ 2025 रोजी सकाळी आठ वाजता चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धेत 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंत्रालय सहाय्यक पदी निवड झाल्या बद्दल शिलधन भोसले व किरण शेंडे (महीम) यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.अमोल उबाळे,प्रशांत माळवदे,अमोल लिंगे, कवडे, ज्ञानेश्वर पाटील,सुनील गवळी, सतिश हेगडे,सातपुते,वेळापूरकर पालक उपस्थित होते.
यावेळी सरपंच रणजीत जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनि या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या पुढील काळात अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातील.याकरीता सर्व सहकार्य मी करीन.असे जाधव म्हणाले.
यावेळी या कार्यक्रमास शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख शिवाजी बाबर ,माजी सरपंच राजीव पाटील ,मराठा समाजाचे नेते धैर्यसिंह निंबाळकर, शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन निहाल शेख यांनी भेट देऊन कौतुक केले.
या कार्यक्रमाचे स्वागत आर के पवार यांनी केले तर आभार धनश्री पवार यांनी मानले. हा कार्यक्रम पार पाडण्याकरिता परफेक्ट कॉम्प्युटरच्या माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.