शाश्वत दुग्धव्यवसायासाठी मुक्त संचार गोठा पद्धत व उत्कृष्ट कालवड निर्मितीवर भर दयावा -डॉ. अनिल भिकाने
प्रतिजैविकांचा कमीत कमी वापर करून उत्कृष्ट दर्जाचे दूध उत्पादन करणे ही काळाची गरज - डॉ. सुखदेव बारबुधे
पंढरपुर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व भाकृअप-राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांचे संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपघटक योजने अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय , शिरवळ जि सातारा व पशुसंवर्धन खाते, सोलापुर यांचे संयुक्त विद्यमाने "एक दिवसीय शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद तथा शास्त्रोक्त्त दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण"कार्यक्रमाचे पंढरपूर जि. सोलापुर येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. सुखदेव बारबुधे, संचालक भा कृ. अ. सं- राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर डॉ अनिल भिकाने,संचालक विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर, डॉ. विश्वास साळुंके प्रभारी सहयोगी अधिष्ठाता, डॉ. विजय येवले, उपायुक्त पशुसंवर्धन, सोलापुर,डॉ. बसव रेड्डी ,प्रमुख शास्त्रज्ञ ,डॉ. योगेश गाडेकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हैदराबाद, डॉ. विश्वास मोरे, निवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. विलास डोईफोडे, सहाय्यक आयुक्त,डॉ. गोकुळ सोनवणे, प्रकल्प समन्वयक उपस्थित होते.
अध्यक्षिय भाषणात डॉ. अनिल भिकाने म्हणाले की दुष्काळी भागात दुग्धव्यवसाय हे उपजिविकेचे एक मुख्य साधन असून पशुपालक आणि युवकांनी दुग्धव्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच
दुग्धव्यवसाय फायदेशीर करणेसाठी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करुन शास्त्रोक्त पद्धतीने आहार व्यवस्थापन, मुक्त सचांर गोठा पद्धत आणि उत्कृष्ट कालवड निर्मिती या त्रिसुत्रीचा अवलंब करावा असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले जनावरांसाठी मुक्त संचार गोठा पद्धतीत मनुष्यबळाची गरज कमी होवून एकंदरीत जनावर आरोग्यदायी व आनंददायी राहिल्याने दुध उत्पादनात वाढ होत असल्याने ही पशुपालकासाठी वरदान ठरत आहे.
झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीनुसार गोपालकांनी अधिक उत्तम दर्जाचे दुध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. सुखदेव बारबुधे यांनी केले तसेच मूल्यवर्धित दुधजन्य उपपदार्थ निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो असे मत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते शास्त्रोक्त्त दुग्धव्यवसाय व्यवस्थापन या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच सोलापुर जिल्ह्यातील प्रगतिशिल पशुपालक समाधान पवार, हनमंत सुरवसे, ज्योतोराम आवताडे यांचा सत्कार करण्यात आले.
तांत्रीक सत्रात डॉ. विश्वास साळुंके यांनी देशी गोवंश संगोपन याविषयावर माहितीपर मार्गदर्शन आणि शंकानिरसन केले. डॉ. प्रशांत म्हसे यांनी दुधाळ जनावरांतील स्तनदाह प्रतिबंध तसेच रेबीज जनजागृती यावर विशेष मार्गदर्शन केले. डॉ. दीपाली सकुंडे यांनी स्वच्छ दुधनिर्मिती तसेच दुधाचे आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ गोकुळ सोनवणे, डॉ अजय खानविलकर, डॉ. चंद्रशेखर मोटे, डॉ. विजय कदम यांनी दुग्धव्यवसाय माहिती प्रदर्शन आयोजनासाठी पुढाकार घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, डॉ प्रियंका कोळेकर डॉ. शिवराज पवार, डॉ. समाधान साळुंखे, डॉ राजू सातळकर, डॉ. प्रताप भोसले, डॉ. तृप्ती भोसले,डॉ.विशाल गावडे, डॉ.तानाजी भोसले, डॉ. ब्रह्मानंद कदम, डॉ. प्रविण खंडागळे, डॉ. मीरा चिखले, डॉ. शुभांगी वासलकर, डॉ. प्रविण जाधव, डॉ. आनंद गवळी, डॉ. वैष्णवी दुधाळ, संजय देशपांडे, अविनाश मोहाले, कौशिक खांदोडे, रत्नाकर हिरेमठ, आशिष ओहोळ,तुकाराम हिप्परकर यांनी अथक परिश्रम घेतले.
डॉ गोकुळ सोनवणे यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचलन डॉ प्रशान्त म्हसे आणि आभार प्रदर्शन डॉ. चंद्रशेखर मोटे यांनी केले. कार्यक्रमासाठी १७० पुरुष व महिला पशुपालक आणि युवक उपस्थित होते.