भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे 34 वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अलका महादेव गुजरे-जमदाडे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
या समारंभास श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिक्षिका अलका गुजरे यांचा सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी,संभाजी शिंदे (शिवसेना जिल्हाप्रमुख), दीपक पवार (मा.राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष) इ. बा. मुलाणी गुरुजी,मारुती केसकर,पंचायत समितीचे सदस्य विजय शिंदे, सहकार शिरोमणीचे संचालक, सुरेश देठे,सुनील पाटील, भाळवणीचे सरपंच रणजीत जाधव, केसकरवाडीचे सहकारी तानाजी केसकर, संजय मासाळ, केसकरवाडीचे सरपंच प्रकाश केसकर, शिक्षक नेते रामभाऊ यादव यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षकवृंद, नातेवाईक, पाहुणे आणि केसकरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक स्वप्नील जमदाडे यांनी केले तर सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले. आभार हणमंत जमदाडे यांनी मानले.


