मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे मित्र न्यायमूर्ती निजाम जमादार यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन
स्वामींचा आशीर्वाद जीवनाला नवी ऊर्जा देत आहेत - महेश सोबतच्या आठवणीना उजाळा देताना चेअरमन महेश इंगळे यांचे शालेय वर्गमित्र न्यायमूर्ती निजाम जमादार यांचे मनोगत
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजाम जमादार यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांच्या शालेय जीवनापासून मित्र असलेले न्यायमूर्ती निजाम जमादार यांचे मनोभावे स्वागत केले. यावेळी न्यायमूर्ती निजाम जमादार यांनी चेअरमन महेश इंगळे यांच्या सोबत अलिंगन व गळा भेट घेऊन मैत्रीचा आदर्श दर्शविला.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी न्यायमूर्ती निजाम जमादार यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना न्यायमूर्ती जमादार म्हणाले की मी आणि महेश हे शालेय जीवनापासून मित्र आहोत, त्या काळात आपणांस शालेय जीवनात उत्तम शिक्षण घेण्यासाठी तल्लख बुध्दीमत्ता लाभावी यासाठी आपण शालेय जीवनात अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थांची भक्ती केली आहे.
स्वामींच्या कृपेने न्यायमुर्ती हे पद मिळाले आहे. शालेय जीवनात महेश आणि मी एकाच बाकावर बसून शिक्षण घेतले आहे. आपली मैत्री आजही तशीच आहे.
त्या स्मृती आजही ताज्या आहेत असे सांगून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. इंगळे कुटूंबीय व जमादार कुटूंब दोन्ही श्री स्वामी समर्थांच्या भक्ती मार्गातीलच आहेत म्हणूनच श्री स्वामी समर्थांनी महेश इंगळे यांना स्वामी सेवेच्या माध्यमातून तर आपणास न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून लोकसेवेची संधी दिली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शन व्यवस्थेच्या माध्यमातून जुन्या मित्राची भेट झाल्याने स्वामी दर्शनाचा आनंद व मित्राची भेट यामुळे आपला आनंद द्विगुणीत झाला आहे असे सांगून महेश इंगळे यांच्या स्वामी सेवेप्रती आपल्या शुभेच्छा असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंदिर परिसरातील भक्तांची गर्दी व दर्शनानंतर मंदिराच्या विकास कामांबाबत जाणून घेऊन न्यायमूर्ती निजाम जमादार यांनी समाधान व्यक्त केले. अक्कलकोट न्यायालयातील मा.दिवाणी न्यायाधीश एम.एम. कल्याणकर साहेब, एन.एल.ए.शेख मॅडम सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर अक्कलकोट न्यायालयातील कर्मचारी वाय.डी.पैठणकर, के.ए.रणदिवे, सोमशेखर बाहेरमठ, अविनाश सुरवसे, सुनील कोनापुरे, अक्कलकोट बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील, ॲडवोकेट मंगरुळे, उमाप साहेब, श्रीशैल गवंडी, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीकांत मलवे व भाविक उपस्थित होते.

