लातूर प्रतिनिधी तेज न्यूज
लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. चाकूर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी एक स्कूल बस उलटून भीषण अपघात झाला आहे. सांडोळ-महांडोळ मार्गावर ही दुर्घटना घडली असून यामुळे परिसरात काही काळ मोठा आक्रोश बघायला मिळाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालया'ची बस
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकूर तालुक्यातील सांडोळ–महांडोळ मार्गावर राचन्नावाडी येथील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालया'ची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यादरम्यान अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटली. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा बसमधून सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी प्रवास करत होते.


