पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस कौशल्या केंद्रे व शिवाजी केंद्रे यांनी एक लाख रुपये ची देणगी दिल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
कौशल्या शिवाजी केंद्रे व शिवाजी भीमराव केंद्रे हे देणगीदार दांपत्य आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सदरची देणगी दिली असून, ते लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत.