मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
“जीवाची मुंबई अन् लहान वयात मोठा अनुभव; थेट विधानभवनाची भेट”
माढ्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून प्रत्यक्ष पाहून लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेतला.
सभागृहातील कामकाज कश्या पद्धतीने चालते, लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न कसे मांडतात? राज्याच्या विकासासाठी निर्णय कसे घेतले जातात. यांची मुलांना आ .अभिजित पाटील यांनी माहीती सांगितली.
गावाकडची मुलं-मुली मुंबईसारख्या ठिकाणी येऊन सभागृहाचं कामकाज पाहतात तेव्हा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी मोठं होऊन सभागृहात उच्च अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज पहावं अशा शुभेच्छा दिल्या.
यासोबतच गावाकडची जुनी म्हण म्हणजे; 'जीवाची मुंबई' करताना लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. त्यांच्या देखील आयुष्यातील कधीच न विसरणारा क्षण असून त्यांच्या आनंदात खूप समाधान मिळालं.
विद्यार्थ्यांनी मुंबई दर्शनाचा आनंद घेत, बलाढ्य मोठ्या मुंबई शहरातील गेट वे इंडिया, मंत्रालय, राजकीय नेत्यांची शासकीय घर, मोठं- मोठ्या उद्योजकांचे बंगले, सुप्रसिद्ध अभिनेत्यांची घरे, खाऊगल्ली, नरिमन पॉईंट, वानखेडे स्टेडियम अशा अनेक गोष्टी पाहण्यात मग्न झालेले विद्यार्थी. मोठमोठ्या असलेल्या इमारती बघून मुलांच्या चेहऱ्यावर जणू प्रश्नचिन्हच उभा राहिला होता.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दररोजच्या दळणवळणातील गोष्टी विकसित होत असलेली शहरं, लोकशाही व्यवस्था, शासनाची कार्यपद्धती आणि राज्यकारभार याविषयी जवळून मिळालेली समज.यावेळी अनेक नेते मंडळींनी भेटी देत सर्वांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

