मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
डिजिटल 7/12 चे जनक म्हणून ओळख असलेले रामदास हरिभाऊ जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
कथित लाच प्रकरण आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणाली राबवण्यात रामदास हरिभाऊ जगताप यांचे मोठे योगदान मानले जाते. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. नवी मुंबईतील सिडकोचे (CIDCO) भूमी व भूमापन अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (वय ५७) यांना २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १३ मे २०२६ रोजी ही कारवाई केली आहे. सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी (Agreement) त्यांनी लाच मागितली होती. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने त्यांना सिडको कार्यालयात रंगेहाथ पकडले.
सहआरोपी:- रामदास जगताप यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणेने ही रक्कम स्वीकारली, त्यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबईतील सिडको कार्यालयात करण्यात आली, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचं गाव जांबुत ( तालुका शिरूर, जिल्हा पुणे ) आहे.


