सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पोलीस बॉईज असोशिएशन तर्फे. पोलीस आयुक्तालय येथे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील गुन्हे शाखा पोलीस आयुक्तालय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील पोलीस कर्मचारी गवळी मॅडम या सर्व मान्यवरांचे शाल नॅपकिन बुके देऊन प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संध्या काळे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना बेडगनूर, संगिता जाधव. शहर अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, शहर उपाध्यक्ष राजश्री पाटील, शोभा बोबे. विधी आघाडी शहर अध्यक्ष ऍड अनुराधा येगडे. उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष. प्रांजली हिंगे. शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष राजश्री तडकासे. आदी मान्यवर उपस्थित होते.
ही संघटना पोलीस कुटुंब व पोलीस कर्मचारी यांच्या साठी कार्य करत आहे. या संघटनेचे संस्थापक रविभाऊ वैद्य, प्रदेश संघटक सुसर भाऊ. प्रदेश अध्यक्ष महिला आघाडीच्या विजयाताई बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना कार्य करत आहे

