पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे जैनुद्दीन मुलाणी यांना “छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा राज्यस्तरीय पुरस्कार” मिळाल्याल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. फलटण येथील ॲग्रो न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित साहित्य संमेलनात हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर फाटे उद्योग समूहाच्या वतीने उद्योगरत्न नागेश दादा फाटे यांच्या हस्ते मुलाणी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना नागेश दादा फाटे म्हणाले की, “जैनुद्दीन मुलाणी यांनी गेल्या सुमारे ३० वर्षांपासून सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजातील विविध विषयांवर त्यांनी लेखन, व्याख्याने व जनजागृतीच्या माध्यमातून सकारात्मक विचार मांडले आहेत. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासारख्या उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेत समाजात जागृती निर्माण केली आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याचा गौरव होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे.”
मुलाणी यांनी सामाजिक जनजागृती, सांस्कृतिक उपक्रम, महिला सन्मान व पर्यावरण संरक्षण यांसारख्या विविध क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. वृक्षारोपण, सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम, तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन करून त्यांनी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या सत्कार प्रसंगी संजय पवार, गणेश दूरतकर, नवनाथ बचुटे सर, गोरख बागल, भास्कर गायकवाड, हनुमंत फाटे सर, डॉ. रमेश फाटे, संजय बागल, प्रभाकर बागल, बाळासाहेब बागल, बापूराव बागल, बळीराम गीड्डे, ओंकार फाटे, गणपत शिंदे, ब्रह्मदेव पाटील, परमेश्वर बागल, औदुंबर माने, अभिमन्यू पवार, उमेश फाटे, शुभम फाटे, बंडू चव्हाण, संतोष पुणेकर, आदमिले मॅडम, ओंकार कथले, बापूराव इंगळे, बापू कोळी, निलेश फाटे, समाधान बागल, ओंकार मासाळ सकटे, ऋषिकेश बागल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी जैनुद्दीन मुलाणी यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

