पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
कवी स्वातीताई वा. तोंडे पाटील यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
८ मार्च, २०२६ ला महिलादिनी त्यांच्या,शिक्षण, साहित्य,काव्य, स्वानुभवी कसदार लेखन, धारदार वक्तृत्व व बहुआयामी कर्तृत्वाची तसेच नुकत्याच ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही मिळालेल्या पुरस्काराची दखल घेऊन, आम्ही मुंबईकर या वृत्तपत्राने कात्रज--पुणे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.शरद काकडे देशमुख,कवी भारत कवितके ,अभिनेते निलेश दातार, अभिनेत्री प्रिया दामले, संपादक प्रमोद सूर्यवंशी, उपसंपादक वसुधा नाईक, योगिता कोठेकर व त्यांचे पती आ.वाल्मिकराव तोंडे साहेब, कन्या प्रिया खताळ व जावई महेश खताळ तसेच विविध ठिकाणावरून आलेले बरेच कवी, कवयित्री यांच्या उपस्थित हा देखणा पुरस्कार सोहळा टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रदान करण्यात आला.

